Ha Amucha Hindustan-हा आमुचा हिंदुस्थान (Marathi)

We do not have the Audio (MP3) of this song available on this website. If you have the audio, please send it to us by uploading it here. Thanks!

n/a

हा आमुचा हिंदुस्थान अम्हाला प्यार
जरि एकचि नसते उणे जगावर गाजविता अधिकार॥धॄ॥

श्री रामचंद्र अवतारला
भूलोक स्वर्ग हा बनला
सदगुण तो शिखरी चढला
मंथरा -कैकयी मुळे परि झाला हाहाःकार॥१॥

ये शिकंदरची स्वारी
रजपूत खडग त्या भारी
शौर्यची शिकस्त झाली
परि फंदफितुरी घूसे घरांमधि परका दे मग मार॥२॥

शिवराय उभारी झेंडा
मोऱ्यांचा मार्गी धोंडा
मोडिले तयाच्या बंडा
परि त्याच ठिकाणी पिसाळ झाला सुर्या अंधःकार ॥३॥

ही पराक्रमाची ज्योत
तव शील-बुध्दिचा पोत
हे सुयश व्यर्थ तरी होत
परि गालबोट हे सुपुत्र सारे पुसतील केव्हा पार ॥४॥

Post new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.
  • Lines and paragraphs break automatically.

More information about formatting options